नकारात्मक व्यवसायांची यादी - पुढील व्यवसायांमध्ये व्यवहार करणारी खाती पीपीबीएलच्या अंतर्गंत ऑन-बोर्डिंग नसतील / शासित केली जाणार नाहीत.

  • बाल आणि प्राणी अश्लीलता
  • विना परवानाकृत औषध व्यवसाय किंवा मंजूर नसलेली रसायने विकणारे व्यवसाय
  • विना परवाना मद्य व्यवसाय
  • जुगार, कॅसिनो
  • क्रिप्टो
  • मौल्यवान धातू, दगड आणि दागिने
  • असे व्यवसाय ज्यांचे निर्देशक / बीओ एफएटीएफ उच्च जोखीम क्षेत्रात आहेत
  • ट्रस्ट, चॅरिटीज, एनजीओ
  • शस्त्रे आणि दारूगोळा उद्योग (उत्पादक, विक्रेते आणि मध्यस्थ)
  • आण्विक क्रियाकलापांशी संबंधित कंपन्या
  • कॉपीराइट सामग्रीची विक्री / खरेदी व्यवहार करणारे फर्म (पुस्तके, संगीत, चित्रपट, सॉफ्टवेअर आणि इतर परवानाकृत सामग्रीच्या अनधिकृत प्रती)
  • बनावट आणि अनधिकृत वस्तूंसह व्यवहार करणार्‍या फर्म ज्यामध्ये डिझाइनर वस्तूंच्या प्रतिकृती किंवा नक्कल समाविष्ट असतात
  • लुप्तप्राय वनस्पती किंवा प्राणी उत्पादनांच्या विक्री / खरेदी संबंधीची संस्था
  • विना परवाना विदेशी मुद्रा आणि आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण व्यवसाय